पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदार संघातील वडगांव निंबाळकर येथे आज दिनांक २१/०२/२०२४ रोजी भारतीय जनता पार्टी च्या कार्यावर विश्वास ठेऊन भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बारामती लोकसभा समन्वयक जालिंदर कामठे, बारामती विधानसभा प्रमुख रंजन काका तावरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस अकाशजी कांबळे, भाजपा तालुका आध्यक्ष P.K. जगताप यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे .असे भाजपा जिल्हा सरचिटणीस अकाशजी कांबळे यांनी माध्यमांना बोलताना सांगितले आहे.
तसेच बारामती ग्रामीण मंडलाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन या वेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त उपस्थित राहून सर्व मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्याच्याशी संवाद साधण्यात आला.असे बोलताना भाजपा जिल्हा सरचिटणीस अकाशजी कांबळे यांनी सांगितले आहे. या वेळी ह्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.