पुणे जिल्हा प्रतिनिधी
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणा विरोधात बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या केल्यामुळे भुजबळ यांच्या विषयी तिरस्कार तयार झाला असून भुजबळ यांनी दिलेला राजीनाम्यावर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे,
तू राजीनामा दे, समुद्रात उडी मार, काहीही कर आम्हाला काय घेणं देणं आहे. डोक्यावर घेऊन फिर राजीनामा. तू मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला तर तुला सोडत नसतो मी. राजीनामा दिला म्हणजे काय उपकार केले का आमच्यावर? आम्हाला काय करायचं त्याच्याशी? तू मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. येवल्याचं ते लय विचित्र आहे. सगळ्या पक्ष मोडायचं हेच त्याला माहीत आहे. ज्या पक्षाने त्याला मोठं केलं तो पक्षही त्याने सोडला. सरकारही मोडायचं असं दिसतंय. माझी सरकारला विनंती आहे जेवढी त्यांची (छगन भुजबळ) ची गरज आहे तेवढी मराठ्यांचीही असू द्या. असं प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.