सुनील भंडारे पाटील
मराठवाडा पुणे एज्युकेशन सोसायटी संचलित जीनिअस स्कूल मराठी माध्यम, वाघोली ( तालुका हवेली )
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले,
शाळेतील बालवाडी ते सातवी पर्यंतच्या वर्गातील लहान विद्यार्थ्यांनी भारुड, कोळीगीते, देशभक्तीपर गीते, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची प्रात्यक्षिके, तसेच रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले, या वर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार रामेश्वरी झांबरे यांना देण्यात आला,
स्नेहसंमेलनासाठी एकनाथ खेडकर ( उपकूलपती अजिंक्य, डी वाय पाटील विद्यापीठ ), संजय केंद्रे( कनिष्ठ प्रशासन अधिकारी पुणे), उत्तमराव भोंडवे ( संस्थापक समाजप्रबोधन केंद्र ), संभाजी चौधरी( संस्थेचे अध्यक्ष ),सचिव भारत गोरे, उपाध्यक्ष कौशल्याताई चाटे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दाते, खजिनदार भैरू राम चौधरी, संचालक सुनील रांजणकर, सुनील अंधारे, मुख्याध्यापिका सुवर्ण धुमाळ, शिक्षक महेंद्र बांबळे, महादेव घुले, मल्लिकार्जुन डिगे,रोहिणी गायकवाड, रामेश्वरी झांबरे, राजश्री बोरुडे, महादेवी चाटे, पूजा नखाते, जयश्री पाटील, सविता पाटील तसेच मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थीउपस्थित होते,
संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव चौधरी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांनी विकासासाठी आमच्या जीनिअस स्कूलच्या माध्यमातून वर्षभरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते, कुशल शिक्षक नेमणुकीमुळे विद्यार्थ्यांची चांगली प्रगती होत आहे, आमचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता तसेच विविध स्पर्धांमध्ये नाविन्य मिळवत आहेत त्यामुळे आम्हा सर्वांना याचा खूप अभिमान वाटला आहे,