लोणी काळभोर प्रतिनिधी
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिनांक २९ फेब्रुवारी रोजी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, पक्ष अंगीकृत संघटना व सर्व शिवसैनिकांची अती तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत ते महत्त्वाची घोषणा व निर्णय घेणार असल्याची चर्चा होत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत उमेदवारी बाबत ते ठाम भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणकीचे पार्श्वभमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार जाहीर करण्यात आले मात्र सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून अद्याप पर्यंत शिरूर लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसल्याने सदर बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केला असल्याचे बोलले जात असुन उमेदवारी मिळवण्यासाठी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कार्यकर्त्यांची चर्चा करून अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात सुरू आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू असून आमदार महेश लांडगे, मा. आमदार विलास लांडे, प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा होती मात्र मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच अमोल कोल्हे यांना जड जाऊ शकतात अशी चर्चा मतदारसंघात होत आहे...