सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल ची ऐतिहासिक माहिती तसेच शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावर सहलीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी असंख्य विद्यार्थ्यांनी या सहलीचा आनंद घेतला,
कोरेगाव भीमा आणि परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी शाळा सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, विविध क्रीडा स्पर्धा, तसेच शैक्षणिक सहली, असे विविध कार्यक्रम राबवले जातात, शिवजयंती चे औचित्य साधून शाळेच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरी येथे सहलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते, या सहलीमध्ये चौथीपासून ते नववी पर्यंत सुमारे 93 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता, यावेळी गाईडच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिवनेरी गडाची पूर्ण माहिती देण्यात आली, यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे/ घुटे, तसेच संचालक कांतीलाल फडतरे, संजय फडतरे, 12 शिक्षक/ शिक्षिका आदि उपस्थित होते,
त्याचप्रमाणे शाळेमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले, शिवगर्जना सोनी ओवी, पोवाडा सोनी ओम, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात अरुण शिंदे व रोहन कुलकर्णी शोभून दिसत होते, 643 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लेझीम ढोल ताशाच्या गजरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला, यावेळी मुलांनी भाषणे केली, याप्रसंगी सर्व संचालक मंडळ, प्रिन्सिपल, शिक्षक वृंद,उपस्थित होते,