नशेत तर्रर्र मुली,उभही राहता येईना पुण्याला हादरवणारा प्रकार उघड

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
            पुणे पोलिसांनी मागच्या काही दिवसांमध्ये 1800 किलो ड्रग्स जप्त केलं आहे. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 4 हजार कोटी आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाई नंतर पुण्यात खळबळ पसरली आहे, त्यातच आता अभिनेते रमेश परदेशी यांनी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आणला आहे.पुण्याच्या टेकडीवर वॉकला गेलेले असताना परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह केलं, ज्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
               पुण्यातल्या टेकडीवर कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी नशेमध्ये असल्याचं दिसत आहे. रमेश परदेशी यांना टेकडीवर फिरायला गेले असताना हा प्रकार दिसला. नशेमध्ये असणाऱ्या या विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याचं सांगितलं जातंय. तसंच आपण त्यांना रुग्णालयात घेऊन जात असल्याचंही रमेश परदेशी यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं आहे. 'दोन्ही मुलींना आम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो आहोत, एक मुलगी ठीक आहे दुसरीची आता थोडी बरी होत आहे, असं रमेश परदेशी 
यांनी माध्यमांना बोलता सांगितले आहे.
            या दोन्ही मुली साताऱ्याच्या असून कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत आहेत. नशेत कोपऱ्यात पडल्या होत्या, अशी माहिती मिळाल्याचही रमेश परदेशी यांनी सांगितलं. माझ्या घरातही एवढीच मुलगी आहे, माझ्या मुलीने असं केलं तर मी कुणाकडे बघायचं? हे पाहून मला घाबरायला होतं, प्रत्येक पुणेकराने या सगळ्यावर लक्ष देण्याची गरज आहे, हा विषय गंभीर आहे, असं रमेश परदेशी म्हणाले.
               आपण योग्यवेळेत विचार केला नाही तर पुण्याचं उडता पंजाब, ड्रग्सचं माहेरघर होण्यासाठी वेळ लागणार नाही. पुण्याचं वाटोळं चालवलं आहे, शिक्षणासाठी इकडे यायचं, पुणेकर म्हणून आता तरी जागृक व्हा, असं आवाहन रमेश परदेशी यांनी केलं आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!