पुणे प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील हडपसर पोलिस ठाणे हद्दीतील (मांजरी पो.स्टेशन) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी एका पीडित महिलेने तक्रार अर्ज दिला असून,यावर कुठलीही कारवाई न झाल्याने पीडित महिलेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार अर्ज स्वीकारला असून पीडित महिलेकडे त्याची पोहाच आहे.
घडलेला घटनाक्रम असा की पीडित महिला या मांजरी बू , स्टडफर्म येथे राहत असून त्यांचे कामगार यांना तुमच्यावर मांजरी चौकी मध्ये गुन्हा दाखल आहे, असे सांगून अटक करण्यात आले.या विषयी वरील पत्यावर राहत असणाऱ्या महिलेला हि बाब कळाली. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार दि.२७ रोजी सायंकाळी ४.३० ते ५ दरम्यान त्यांनी पोलिस स्टेशन ला धाव घेतली ,माझा कामगाराला कोणत्या गुन्ह्या संदर्भात अटक केले असे विचारणा केली असता.मांजरीचे पो.सहाय्यक यांनी चल पळ येथून, हि माझी चौकी आहे जा काय करायचे ते कर, तुझ्या सारख्या खालच्या लेवलच्या बाईला मी शरीर विक्रीचा समजतो,
असे बोलून अतिशय खालच्या शब्दात शिवीगाळ करून अंगावर धाऊन आले. माझा नादी लागलीस तर तुला कोणत्याही गुन्ह्यात अडकवेल.या वेळी चौकीतील पोलिस व्हिडिओ काढत लज्जाभंग होताना पाहत होते ,तसेच पोलिस सीसीटीव्ही फुटेच देत नसतील तर माहिती अधिकारातून मिळेल असे तक्रार अर्जात लिहिले आहे.यावर पो. सहाय्यक यांचावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.कायद्याचे रक्षकच भक्षक बनत असतील तर सामान्य जनता कोठे न्याय मागणार अशी सर्व सामान्य जनतेचा मनात भीती निर्माण होत आहे.कायदा हा सर्वांना समान आहे. गुन्हा दाखल करण्यात यावा असे पीडित महिला म्हणत आहे.त्यामुळे विनयभंग गुन्हा पोलिसावर दाखल होईल का ? असा चर्चेचा विषय ठरला आहे.