पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार,रितेश कुमार यांची बदली

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी 
अतिरिक्त पोलिस महासंचालक अमितेश कुमार यांची बुधवारी (दि. ३१) पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी गुरुवारी सायंकाळी रितेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमितेश कुमार म्हणाले की, 'नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण, तसेच त्यांच्याबरोबर सकारात्मक संवाद ठेवण्याची आमची प्राथमिकता राहील.
         गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांची सुरक्षा, शहरात जे अंमली पदार्थाचे हॉटस्पॉट आहेत, त्याच्याकडे आमचे लक्ष राहील. व्हिजिबल पोलिसिंग कसे वाढविता येईल याच्यावर माझा भर असेल. अतिरेकी कारवाया होऊ नये यासाठी आमचे प्राधान्य असेल. सामान्य जनतेला सोबत घेऊन आमचा काम करण्याचा मानस राहील असेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले आयुक्त ?
- क्राईम नियंत्रणाच्या दृष्टीने दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याचा वापर करणाऱ्यांवर परिणामकारक कारवाई केली जाईल.

- शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील टॉप २० गुन्हेगारांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाईल.

- कॅमेरा आधारित वाहतूक नियंत्रणावरही आमचा भर असेल, असेही ते म्हणाले.
- ट्रिपल सीट आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल. हेल्मेट वापरण्याच्या संदर्भात आधी जागृती करण्यात येईल.
- सायबर गुन्हेगारी संदर्भात मनुष्यबळ वाढविण्यात येईल.
अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. सराईत गुन्हेगारावर मोक्का, स्थानबद्धतेची कारवाई यापुढेही सुरू राहील. कायद्याचा वचक गुन्हेगारांवर राहिला पाहिजे. सायबर गुन्हेगारी संदर्भात मनुष्यबळ वाढविण्यात येईल, तसेच खासगी तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल, असेही अमितेश कुमार यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!