इंदापूर शहरालगतचे बायपास रोड वरील जगदंबा हॉटेलमध्ये झालेल्या खुनाचे गुन्ह्याचा इंदापूर पोलिसांनी केला चोवीस तासात उलगडा पूर्व वैमन्याशातून झाला होता खुन स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई.
दिनांक 16 रोजी संध्याकाळी आठ वाजता सुमारास अविनाश बाळू धनवे वय वर्ष 31राहणार चरोली बु. वडमुखवाडी ता.हवेली जि. पुणे या इसमाचा इंदापूर येथील जगदंबा हॉटेल येथे अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून खुन केला होता त्यातील फरारी आरोपींना शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांना २४ तासाच्या आत गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब, मा.पोलीस अधीक्षक संजय जाधव बारामती विभाग, मा.पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड बारामती विभाग, स्वप्निल जाधव दौंड विभाग यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकांसह पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे इंदापूर पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तपासून व फिर्यादी यांच्याकडून प्राप्त माहितीचे आधारे सदरचा गुन्हा दोन गुन्हेगार टोळीतील पूर्व वैमनश्यातुन झाला असल्याचे निष्पन्न झाले .
मयत अविनाश बाळू धनवे याची चरोली आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती तो रेकॉर्डवरील सराई गुन्हेगार आहे त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळीसोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याचे विरोधी तोडणीच केला असल्याची माहिती प्राप्त झाली सदर गुन्ह्यातील आरोपी हे कोल्हापूरकडे पळून जात असल्याची बातमी गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाली होती तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर आरोपी शिवाजी बाबुराव भेंडकर वय ३५ वर्ष राहणार पद्मावती रोड साठे नगर आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे, मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे वय २० वर्षे राहणार आंबेडकर चौक पोलीस चौकी समोर आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे, सतीश उर्फ सला उपेंद्र पांडे वय २० वर्ष राहणार शाळा नंबर ४ चरोली रोड सोपान जाई पार्क आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे, सोमनाथ विश्वंभर बत्ते वय २२ वर्षे राहणार मरकळ रोड तालुका खेड जिल्हा पुणे
यांना पुणे कोल्हापूर हायवे रोड वरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वी खुन खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यातील इतर पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो.पुणे ग्रामीण , माननीय अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव बारामती विभाग, माननीय अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, मा. एस.डी.पी.ओ, भाऊसाहेब ढोले,हवेली विभाग स्वप्निल जाधव, दौंड विभाग , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, कुलदिप संकपाळ, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे अमित सिद्पाटील, पोलिस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे , स्वप्नील अहीवळे, राजू मोमीन ,अतुर डेरे सचिन घाडगे, अजित भुजबळ मंगेश थिगळे, अजय घुले
प्रकाश वाघमारे , जनार्दन शेळके तुषार पंधारे, विक्रम तापकीर दीपक साबळे ,संदीप वारे बाळासाहेब खडके, राहुल घुबे निलेश सुपेकर, अक्षय नवले निलेश शिंदे, काशिनाथ राजापुरे अक्षय सुपे, दगडू विरकर, इंदापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस सब इन्स्पेक्टर गरड, पो. अंमलदार प्रकाश माने, सचिन बोराडे सलमान खान नंदू जाधव विशाल चौधर अमित यादव, विनोद काळे मपोहा. माधुरी लडकत यांनी केले आहे आरोपींना मा. न्यायलयात हजर करण्यात येणार आहे असे या वेळी माध्यमांना सांगण्यात आले आहे.