पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधील हॉटेल जगदंबा मध्ये शनिवारी रात्री जेवण करणाऱ्या एका व्यक्तीची निर्गुण अशी हत्या करण्यात आलेली आहे, पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये येऊन त्या तरुणावरती अगोदर गोळ्या झाडल्या व नंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे, या हत्येचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
सदरील हत्येची माहिती मिळताच इंदापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जागेवर पंचनामा करून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी इंदापूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवला आहे ही घटना घडली तेव्हा बरेच लोकं जगदंबा हॉटेलमध्ये जेवण करत होते तेव्हा त्या ठिकाणी अनपेक्षितपणे हल्ला झाल्याने हॉटेलमधील लोकं जीवाच्या आकांताने सैरावैरा हॉटेलच्या बाहेर धावत सुटले, असे प्रत्येक्षदर्शनीं सांगितले आहे, पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळ असणारे जगदंबा हॉटेल येथे सदरील खुनाची घटना घडलेली असून मयत इसमाचे नाव अविनाश बाळू धनवे असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश दि.१६ शनिवारी रात्री त्याच्या मित्रांसोबत जगदंबा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबला असताना जेवणाच्या जागेवरतीच हॉटेलमध्ये अनोळखी पाच ते सहा इसमांनी येऊन त्यातील एकाने अविनाश वरती मागून आपल्या पिस्तूल मधून अनेक गोळ्या झाडल्या व त्याच्यावरती बाकीच्या इस्मानी धारदार शस्त्रांनी वार केले व अविनाश मेल्याची खात्री पटल्यानंतरच सर्व अनोळखी इसम घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत