हवेली प्रतिनिधी
पुणे दि.२७ मार्च २०२४ रोजी आकाशवाणी, हडपसर येथून पेट्रोलींग दरम्यान मोबाईल फोन व वाहन चोरी करणारा सराईत वैभव बिनवडे यास पुणे गुन्हे शाखेचे युनिट ५, चे पथकाने जेरबंद केले त्याच्याकडून ३ मोबाईल हन्डसेट व मोटार सायकल एकुण ८२,०००/ - रु .कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार युनिट ५, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील तपास पथक हे युनिट कार्यक्षेत्रात हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार विनोद शिवले व शशिकांत नाळे यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव बिनवडे याने हडपसर परिसरातुन मोबाईल चो-या केल्या असुन चोरी केलेले मोबाईल फोन हे विक्री करणे कामी त्याचेकडील नंबरप्लेट नसलेली हिरो स्प्लेंडर मोटार सायकलवरुन आकाशवाणी, हडपसर येथे येणार आहे.
त्याप्रमाणे युनिट कडील स्टाफने वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथक हे आकाशवाणी, हडपसर येथे सापळा लावुन थांबले. थोडयाच वेळात पोलीस ओळखत असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव नागनाथ बिनवडे, वय- २० वर्षे, रा. सय्यदनगर, गल्ली नं. १६ मश्जिदच्या पाठीमागे, हडपसर, पुणे हा आल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले. व त्याचेकडे बातमीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत त्याचे कब्जातुन एकुण ८२,०००/-रु.कि.चा मुद्देमाल त्यामध्ये एकुण ३ मोबाईल हन्डसेट व मोटार सायकल हे मिळुन आले असुन ते हडपसर व मुंढवा पोलीस ठाणे येथे चोरीच्या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपी कडुन हडपसर व मुंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आलेले आहे.सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, सतिश गोवेकर,यांचे मार्गदर्शनाखाली युनिट - ५, गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे,पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, दया शेगर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख व पल्लवी मोरे यांनी केलेली आहे.