महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकसभेच्या आचारसंहिते नंतर राजकीय बैठकांना व घडामोडींना प्रचंड वेग आलेला असून त्यामध्ये बारामती लोकसभेची जागा जिंकायचीच या हेतूने बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक मुंबई येथे दिनांक 29 रोजी बोलावलेली होती या बैठकीत इंदापूर भाजपाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा धनगरी घोंगडे देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघामध्ये भाजपाच्या विचाराचा खासदार निवडून आणायचा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून इंदापूर मधील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले तसेच हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत तसेच त्यांना मोठे करण्याची जबाबदारी ही आमचीच आहे असे इंदापूर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना यावेळी आश्वासित केले.
इंदापूर विधानसभेच्या जागेवरून अद्यापही अजित पवार गट व भाजपा इंदापूर यांचे मनोमिलन झालेले नाही ते होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून इंदापूर मधील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळी या बैठकीस राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती साखर कारखाण्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, गजानन वाकसे, नाना शेंडे ,लाला पवार, बाबा महाराज खरतोडे शेखर पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे जिल्हा दक्षिणच्या संघटनात्मक कामाचा आढावा यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस आकाशजी कांबळे तसेच ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांच्याकडून घेतला यावेळी भाजपा पुणे जिल्हा चिटणीस रमेश चांदगुडे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यावेळी बैठकीस उपस्थित होते.