आळंदी प्रतिनिधी
आज रंगांचा उत्सव आहे...हा फक्तं रंगांचा उत्सव नसून हा उत्सव आहे आनंदाचा, उत्साहाचा.आज घराघरात, मनामनात एक चैतन्य भरलेले आहे...रंग सर्वांना आवडतात, मोहित करतात...आज असा एकही व्यक्ती नाहीं की तो रंग खेळणार नाहीं... कारण त्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही... आजचा दिवस रंगाची मुक्त उधळण करण्याचा दिवस आहे...
निसर्गामध्ये विविध प्रकारचे रंग आहेत... आजचा उत्सव या रंगांचा आहे... यामुळें या रंगांचा आनंद घेताना आपल्याला निसर्गाचे भान ठेवायचे आहे... आज अनेक ठिकाणी रासायनिक रंग वापरले जातात... हे रंग मानवी शरीराला हानी करतात.. तसेच पर्यावरणाची हानी करतात... तसेच आज दारूचा वापर खूप केला जातो... यामुळे समाजात व्यसनाधीनता प्रचंड वाढत आहे.. या गोष्टींमुळे पर्यावरणाचे व समाजाचे संतुलन बिघडत आहे... यावर्षी आपण नैसर्गिक रंग बनऊन धुलीवंदन साजरे करू.... तसेच दारुमुक्त सण साजरा करू....हा सण आपण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करू... आजच्या दिवशी आपण प्रदूषण कमी करू, झाडें लावू, प्लास्टीक चां वापर कमी करू, नदीमध्ये निर्माल्य टाकण्याचे बंद करू, पक्षांना चारा पाणी देऊ.. स्वतःला जे शक्य होईल ते करूं,