सुनील भंडारे पाटील
वाजेवाडी (ता. शिरूर) वाजेवाडी गावठाणातील जून्या ट्रान्सफार्मर वरून विजेचा होल्टेज कमी दाबाने येऊन सतत विज विस्कळीत होत असून घरातील विद्युत उपकरणे तसेच गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहीरीवरील विद्युत पंप चालत नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या होत असल्याने वाजेवाडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत वीजेची खूप गंभीर परिस्थिती उद्भवली असून याकडे मात्र वीज वितरण खाते व वाजेवाडी गावचे लोक प्रतिनिधी यांचे पूर्णतःहा दुर्लक्ष झालेले आहे,
काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे नवीन ट्रान्सफार्मरची मागणी केली होती त्यास त्वरीत मंजुरी मिळून ट्रान्सफार्मर बसविला परंतु जुन्या ट्रान्सफॉर्मर वरील लोड कमी केला नाही तसेच नवीन ट्रान्सफार्मरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, त्यासाठी लागणाऱ्या तार या कमी जाडीच्या वापरल्या आहेत, त्यावरती लोड आल्यास त्या वितळून जातात परिणामी विजेचा दाब कमी येऊन उपकरणे चालत नाही तसेच गावातील स्ट्रीट लाईट बंद आहे अश्या अनेक समस्यांचा ग्रामस्थांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. अशी माहिती वाजेवाडीचे मा. उपसरपंच अमीत सोनवणे यांनी माध्यमांना दिली ऐन उन्हाळ्याच्या काळात नवीन ट्रान्सफॉर्मर बसूनही त्याचा उपयोग होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमण झाले आहेत सदरील महावितरण कंपनीने सदरील समस्या त्वरीत दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे
ग्रामपंचायत प्रशासन हे गावातील रहिवासी नागरिकांचे वीज बत्ती कर ग्रामस्थांकडून आकारत असते त्यामुळे गावामध्ये गावठाण व वाड्या,वस्त्यांवर वीजेच्या उद्भवणाऱ्या समस्यांकडे खरे तर वीज वितरण खात्यासह, गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु या वाजेवाडी गावातील उद्भवलेल्या वीज समस्येकडे पाहता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले पहावयास मिळत आहे .