जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेकरवाडी तालुका शिरूर येथे बाल आनंद मेळावा आयोजित केला होता.सर्व पालक व ग्रामस्थांनी मोठया संख्येने सहभागी झाले,
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बाजार, दैनंदिन व्यवहार यांची माहिती होण्यासाठी बाजाराचे आयोजन केले होते. बाजारात विद्यार्थी खाण्याचे पदार्थ, भाजीपाला या प्रकारचे अनेक स्टाॅल लावण्यात आले आणि अतिशय उत्साह मध्ये मुलांनी सर्व भाजीपाला तसेच खाण्याचे पदार्थ ग्रामस्थांना आणि पालकांना विकले. यामुळे मुलांना व्यावाहारिक महिती समजली. ह्या आनंद मेळावा मध्ये कमीत कमी २५ ते ३० हजार रुपये ची उलाढाल झाली. ह्या वेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, आणि सर्व सदस्य, यांनी मुलांचे कौतुक केले तसेच सर्व शिक्षक वर्ग चे अभिनंदन केले.