महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पाच टप्प्यात पार पडणार- मुख्य निवडणूक आयुक्त यांची माहिती

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
              दिल्ली येथे झालेल्या दिनांक 16 रोजीच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले की महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांच्या निवडणुका ह्या पाच टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत व त्याचा निकाल 4 जुन रोजी लावण्यात येणार आहे. ते मतदारसंघ पुढील प्रमाणे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दिनांक 19 एप्रिल रोजी रामटेक,नागपुर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली- चिमूर तसेच चंद्रपूर येथील मतदान पार पडेल.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला,अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली नांदेड व परभणी येथील मतदान पार पडेल.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दिनांक 7 मे रोजी रायगड बारामती, धाराशिव, लातूर , सोलापुर,माढा,सांगली, सातारा रत्नागिरी-सिंधुदुर्ग,कोल्हापूर व हातकणंगले येथील मतदान पार पडेल.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दिनांक 13 मे रोजी नंदुरबार,जळगाव,रावेर, जालना छत्रपती संभाजीनगर, मावळ , पुणे, शिरूर , अहमदनगर, शिर्डी व बीड येथील मतदान पार पडेल.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दिनांक 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, ठाणे तसेच मुंबईतील सहा मतदार संघ पुढीलप्रमाणे मुंबई-उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य व मुंबई दक्षिण येथील मतदान पार पडेल आणि या मतदारसंघांचा निकाल मतमोजनणी होऊन 4 जुन रोजी लावण्यात येईल असे मुख्य निवडनुक आयुक्त राजीव कुमार यांनी माध्यमांना सांगितले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!