आळंदीत पोलिसांचा शांततेसाठी रूट मार्च

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी
             आळंदी पोलीस स्टेशन चे वतीने वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे येत्या लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ३ चे चाकण विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांचे प्रमुख उपस्थितीत शांततेसाठी रूट मार्च काढून संचलन केले. यावेळी आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस कर्मचारी वृंद उपस्थित होते.
   लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे तारखा जाहीर करून देशात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणूक शांततामय आणि निर्भय वातावरणात व्हावी. देशात मतदारांनी कोणत्याही धमक्या व अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क वापरावा. यासाठी आळंदी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रा तील तीर्थक्षेत्र आळंदीत मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावरून तसेच शहरात विविधी मार्गावरून आळंदी पोलिसांनी संचलन करीत रूट मार्च काढला. समाज कंटकांना यातून दहशत मिळून निवडणुका निर्भय वातावरणात होण्यास मदत होणार आहे. येत्या काळात देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पार पडणार आहे.
           आळंदीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभाग, स्थानिक पोलिस स्टेशनच्या वतीने संचलन उत्साहात करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ३चे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, आळंदी पोलिस स्टेशनचे निरीक्षक भिमा नरके, पोलिस नाईक मच्छीद्र शेंडे यांचेसह पोलीस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!