जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
श्री हनुमान मारुती देवस्थान ट्रस्ट नेतवड व समस्त ग्रामस्थ नेतवड यांच्या वतीने उपशिक्षक श्री सुनील निवृत्ती बनकर यांना 2024 चा मानाचा पसायदान समाजरत्न पुरस्कार प्रदान
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेतवड या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून कार्यरत असणारे सुनील निवृत्ती बनकर उपशिक्षक यांना यंदाचा पसायदान समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चाकोरीबद्ध जीवन तर प्रत्येक जण जगतच असतो. पण चाकोरीच्या बाहेर जाऊन त्यांनी नेतवड गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. वाडी वस्ती व मळ्यातील मुले स्वतः स्वतःच्या गाडीने गोळा करणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे व पुन्हा घरी सोडणे. अशी आगळीवेगळी सेवा गेली पाच वर्ष ते निरंतर करत आहे. कोणतेही प्रसिद्धी किंवा कोणत्याही मानधनाशिवाय. हे सेवेचे व्रत निश्चित प्रेरणादायी असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. याचाच सुपरिणाम म्हणून शाळेचा पट वाढण्यासही मदत झालेली आहे.
कोणतीही अभिलाषा न बाळगतात निरंतर केलेल्या सेवेचे फळ हे नक्कीच चांगले मिळते असा विश्वास या पुरस्काराच्या निमित्ताने बनकर सर यांनी व्यक्त केला असून अधिक जबाबदारीने व आनंदाने पुढेही ते काम अखंड करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबद्दल ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ नेतवड यांचे आभार व्यक्त करण्यात आले.