ग्रामपंचायत शिक्रापुर (ता. शिरूर). पुणे. येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग. महाराष्ट्र शासन. जिल्हा परिषद पुणे स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग स्वच्छ भारत मिशन व साईप्रेम ग्रामीण विकास संस्था,(KRC) यवतमाळ यांच्या सयूक्त विद्यामाने घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन ग्रामस्तरीय क्षमता बांधणी दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजीत करणेत आले.
या प्रशिक्षणासाठी, वढु ब!(संभाजीनगर) कोरेगाव भिमा,सणसवाडी, शिक्रापुर,आपटी, वाजेवाडी करंदी, केंदुर, पाबळ, धामारी, मुखई, जातेगाव बु!,जातेगाव खु!,जगताप पिंपळे,विठ्ठलवाडी ,तळेगाव ढमढेरे, माळवाडी, हिवरे कुंभार, कासारी, ईत्यादी गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडीतील सेविका, आशा वर्कर, जलसुरक्षक, हे प्रशिक्षणार्थी उपस्थीत होते. उद्घाटन समयी ग्रामपंचायत शिक्रापुर विद्यामान सरपंच रमेशशेठ गडदे. उपसरपंच सिमा लांडे. ग्रामविकास अधिकारी एस.व्ही शिंदे. वरील गावातील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षण समयी प्रशिक्षण देताणा प्रशिक्षक सुर्यकांत रामभाऊ शिवले.