धूळ प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या खडी क्रेशरचा ग्रामपंचायत परवाना रद्द होणार

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
                 रविवार दि ३ मार्च २०२४ रोजी ग्रामपंचायत लोणीकंद (तालुका हवेली) कार्यालयात धूळ प्रदूषणाबाबत विशेष ग्रामसभा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच. प्रियंका झुरुंगे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली, तसेच धूळ प्रदुषणाबाबत शासनाने दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या सदरील क्रेशरचा ग्रामपंचायत परवाना रद्द होणार असा ठराव एकमताने ग्रामसभेत मंजूर करण्यात आला .
                 गौण खनिजाची वाहतूकीमुळे धूळ प्रदूषण होते त्यामुळे परिसरातील नागरीकांना होणाऱ्या त्रास मुळे  ग्रामस्थांनी दि.२३ फेबुवारी २०२४ रोजी लेखी अर्जाद्वारे ५०० सहयानिशी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी ग्रामपंचायती कडे केली होती त्या मागणीची दखल घेऊन विशेष ग्रामसभा आयोजित केली त्यामध्ये धूळ प्रतिबंधक उपायोजने वरती नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामस्थ व ग्रा. सदस्य यांची समिती स्थापन होणार असून सदरील क्रशर / डांबर प्लांट सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालविण्यात यावा रात्रीचे वेळी सायंकाळी ६ ते सकाळी ६ प्लांट बंद असावेत, वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्या ताडपत्रीने झाकलेल्या असाव्यात , ताडपत्री नसल्यास गाडीवर ५०००/- ची दंडात्मक कारवाई करून, गाडी खाली करून घेतली जाणार आहे, सदरील वाहनाचे बॉडी लेव्हल पर्यंत मटेरियल असणे आवश्यक आहे, नगररोड ते क्रशर/डांबर प्लांट व अंतर्गत रस्त्यावर पाणी मारण्यात यावे. तसेच स्पिंकलर बसविणे इ. तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सायलेंसरची पोझिशन नियमाप्रमाणे ठेवणे, वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे त्या बाबतचे सर्व नियमांचे पालन करणे आपलेवर बंधनकारक आहे. क्रेशर चालकांनी धूळ प्रतिबंधक उपाय योजनेचे हमीपत्र दिल्यानंतर सदरील क्रेशर सुरु करावे, जाणून बुजून हलगर्जीपणा करून नियम व अटींचे उल्लंघन करणाऱ्या सदरील क्रेशरचा ग्रामपंचायत न हरकत परवाना रद्द करण्यासाचा निर्णय सरपंच . प्रियंका झुरुंगे व ग्रामपंचायत सदस्य तसेच  ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत घेण्यात आला 
            या ग्रामसभेत अनेक ग्रामस्थांनी धूळ प्रदूषणाबाबत अनेक सूचना केल्या त्या सूचना अध्यक्ष व ग्रामसभेतील वरिष्ठांनी समजून घेत सदरील निर्णय दिला तसेच सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी यांनी काम पाहिले सदर नोटीस प्रत माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सादर मा.जिल्हा अधिकारी , जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, मा. जिल्हा खनिकर्म अधिकारी सो.जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांच्याकडे पत्र व्यवहार केल्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले .
              या ग्रामसभेस पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, संत समाज सुधारक उत्तम अण्णा भोंडवे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव कंद, उद्योजक मारुती भूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप वसंत कंद, ह भ प गुलाब नाना कंद, माजी आदर्श सरपंच अनिल होले, माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद, सामाजिक कार्यकर्ते सोपान शिवराम कंद, हभप रवींद्र कंद, माजी सरपंच सागर गायकवाड, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य तसेच विशेषतः तरूण वर्ग, बहुसंख्य जेष्ठ नागरीक ग्रामसभेसाठी उपस्थित होते .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!