इंदापुर प्रतिनिधी
म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथेआज दिनांक ०४/०३/२०२४ रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.विकास कामांचे भूमिपूजन करताना गावचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र राऊत हे अध्यक्षस्थानी होते तसेच उपसरपंच राणी मारुती पवार ग्रामसेविका- सोनाली गवळी , ग्रामपंचायत सदस्या- माधुरी श्रीकांत चांदगुडे,सविता अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य- दत्तात्रय काशिनाथ राऊत, माजी सरपंच- रूपाली खंडाळे,व छाया पवार, रेखा पवार ,तसेच नानासो , दत्तात्रय तावरे, व्यंकट तावरे, सुनील खंडाळे, लालासो चांदगुडे , सामाजिक कार्यकर्ते- प्रशांत चांदगुडे व पत्रकार संजय चांदगुडे या वेळी उपस्थित होते.
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेतुन १,८७,००५ रुपये खंडाळे वस्ती नंबर-२ येथील रस्ता सिमेंट कॉंक्रिटी करण करणे. तसेच गावातील सार्वजनिक पाच ठिकाणी एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या बसवणे व त्यासाठी कट्टा तयार करणे या साठी ९०,९०१ रुपये इतक्या निधीची तरतुद करण्यात आली आहे, असे बोलताना सरपंच राजेंद्र राऊत यांनी सांगितले आहे.
जिल्हा नियोजन समिती कडून मंजूर होऊन आलेला निधी ५०,००००० लक्ष रुपये निधीतुन स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण करणे तसेच इतर पाच रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे यांच्या कामांची टेंडर प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येऊन त्या विकासकामांचे भूमिपूजन हि लवकरच करण्यात येईल असे ग्रामसेविका- सोनाली गवळी मॅडम यांनी सांगितले आहे