आळंदी प्रतिनिधी
सुसंस्कृत, अभ्यासू , लोकप्रिय आणि जनतेच्या मनातील माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित जननायक या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले.
या पुस्तकाचे लेखक मनोज पाटील असून पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे केंद्रीय निमंत्रक समिती सदस्य डॉ. रामशेठ गावडे आहेत. या पुस्तकाची विशेष संकल्पना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची असल्याचे डॉ. रामशेठ गावडे यांनी सांगितले. प्रकाशन सोहळ्या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुस्तक पाहत पुस्तकाचे तसेच सर्व संबंधित यांच्या कार्याचे कौतुक करून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
जननायक पुस्तक प्रकाशन सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बसवराज पाटील, हर्षवर्धन पाटील, खासदार रणजीत नाईक निंबाळकर, श्रीकांत भारतीय, रवी ज्यानासपुरे, गणेश सांडभोर, हरी एरंडे, भाऊसाहेब सावंत, सुशांत गाडे, बाजीराव बुचडे, गणेश शेळके, काका कुलकर्णी आदी उपस्थित होते.