प्रतिनिधी शिरूर
आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत असताना निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका सिस्टर लूसी कुरियन यांच्या संकल्पनेतून हा महिला मेळावा पार पडला. मेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेतील बालकांनी प्रार्थना नृत्य केले.
समाजामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळवलेल्या श्रद्धा शेंगदाणे, इंग्लिश मीडियम स्कूल चालवणाऱ्या विद्याताई कनमोसे, माहेर संस्थेच्या ब्युटी पार्लर, टेलरिंग यांचे ट्रेनिंग घेऊन इतरांना शिकवणाऱ्या मंगल गर्जे , माहेर संस्थेची वृषाली भागवतजी आज पोलीस आहे, संस्थेमध्ये सर्व मुला-मुलींना कथक शिकवणाऱ्या सुषमाताई जाधव, संस्थेत सुरक्षिततेची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडणाऱ्या हर्षा शितोळे इत्यादी कर्तुत्वान महिलांचा यावेळी शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे व्याख्याते जगदीश ओहोळ सर यांनी आपल्या मनोगतामध्ये महिला दिन साजरा करताना महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच प्रत्येक महिलांचा आदर करणे म्हणजे महिला दिन साजरा करणे. स्त्री म्हणजे सहनशक्तीची परिसीमा असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक स्त्रीला हा देश म्हणजे स्वतःच माहेर असल्याचे वाटेल तेव्हा खरा इतिहास घडेल, प्रत्येक स्त्रीला संविधानामुळे मुक्ती मिळाली त्या संविधानाची आठवण ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई मांढरे यांनी यावेळी महिला शक्ती ओळखून महिलांनी एकसंघ होण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले व महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस मोनिकाताई हरगुडे यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांनी शरीर व आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान केले.महिलांनी स्वतःला कमी लेखू नये. महिला या देश चालवत असल्याचे मत व्यक्त करून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वकील अर्चना कोकरे मॅडम यांनी महिलांचे मूलभूत अधिकार व देशांमधील महिलांचे कायदे या विषयावरती मार्गदर्शन केले. शिवव्याख्याते सुचिताताई भिसे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगताना चौकटी बाहेर जाऊन विचार करायला शिकावे असा सल्ला महिलांना दिला. सर्व महिलांमध्ये एक वेगळी प्रेरणा निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
माहेर संस्थेतील महिलांनी नृत्य सादर करून उपस्थित महिलांची मने जिंकली. श्रद्धा सोनके या विद्यार्थिनीने 'आई 'या विषया वर एकपात्री नाटिका सादर केली सदर नाटका वेळी उपस्थित सर्व भावनावश झाले होते.या महिला मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, मोनिकाताई हरगुडे, कुसुमताई मांढरे, वढू बुद्रुक गावचे सरपंच अंजलीताई शिवले, प्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहोळ, वकील अर्चनाताई कोकरे, शिवव्याख्याते सुचिता भिसे, ओबीसी माळी महासंघाच्या अध्यक्षा शितलताई कापरे, आपटी गावच्या सरपंच सुनीताताई शिवले, पंचायत समिती सभापती संजीवनीताई कापरे, माहेर संस्थेच्या अध्यक्षा हीरा बेगम मुल्ला, व्यवस्थापक शिर्ली अँथोनी पंचक्रोशीतील महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना मीरा गायकवाड यांनी केले व सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले.तर तेजस्विनी पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.