येथील इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट तर्फे दैनंदिन इंद्रायणी महाआरती पूर्वी महाआरती स्तंभ घाट स्वच्छता साफसफाई आणि घाटावर पाणी टाकून घाट स्वच्छ करून घेण्यात आला. इंद्रायणी नदी घाटावर दैनंदिन इंद्रायणी महाआरती होत असून,
या सामाजिक, पर्यावरण पूरक आणि प्रदूषण मुक्त आळंदी व्हावी या उपक्रमास विविध सेवाभावी संस्था, पर्यावरणप्रेमी व्यक्ती संस्था पदाधिकारी, वारकरी, भाविक, नागरिक यांचे कडून उत्साही प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट आळंदी अध्यक्ष अर्जुन मेदनकर, उपाध्यक्ष राहुल चव्हाण, रोहिदास कदम, माऊली घुंडरे, दिनकर तांबे, महारुद्र हाके, गोविंद ठाकूर, सचिन शिंदे, महादेव पाखरे, नितीन नणवरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरिनाम गजरात इंद्रायणी महाआरती आणि नदी घाटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दैनंदिन इंद्रायणी काठी इंद्रायणी महाआरती होय असून या उपक्रमातून परिसरात स्वच्छता विषयक जनजागृती केली जात आहे. या उपक्रमात भाविक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले आहे.