पुणे जिल्हा प्रतिनिधी
दिल्ली येथे दि.१६ रोजी संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांची तारखे चा बिगुल अखेर वाजला निवडणूक आयोगाकडून आज लोकसभा निवडनुकांची तारीख आज घोषीत करण्यात आली आहे आजच्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे तसेच लोकसभा निवडणुकीत कशाप्रकारे तयारी केली जाईल याचीही माहिती यावेळी प्रसारमाध्यमांना दिली गेली.
संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका ह्या सात टप्प्यात पार पडणार असून त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान हे १९ एप्रिल,दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल,तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे,चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे,पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे,सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान हे १ जुन रोजी पार पडेल आणि ४ जुन ला लोकसभा निवडणुकांचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे तसेच आजच सोळा तारखेपासून लोकसभेची निवडनुकांची आचार संहिता चालू झालेले आहे असे यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलेले आहे.
संपूर्ण ९७.८कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत त्यापैकी ४७.९ कोटी पुरुष मतदार आणि ४७.१ कोटी महिला मतदार आहेत तसेच १.८२ कोटी नवीन मतदार आहेत या लोकसभेला ८२ लाख प्रौढ मतदार हे मतदान करणार आहे व ४८ हजार तृतीयपंथीय मतदार यावेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे.