सुनील भंडारे पाटील
निमगाव म्हाळुंगी (ता शिरूर)येथील 122 श्री रामभक्त अयोध्या या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी गेलेले होते. अयोध्यामध्ये गेल्यानंतर तेथिल वातावरण पाहून श्री रामभक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत होते. अयोध्यामध्ये नवीन तयार करण्यात आलेली रामलल्लांची गाणी महिला श्री राम भक्तांनी पाठ केली होती.अशाप्रकारचा आनंद निमगाव म्हाळुंगीतील श्री राम भक्तांवर दिसून येत असतानाच निमगाव म्हाळुंगी येथे अयोध्येवरून आलेल्या सर्व श्रीराम भक्तांची मिरवणूक काढली होती,
तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाह तथा समस्त हिंदू आघाडी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय मिलिंदभाऊ एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसभेचे आयोजन निमगाव म्हाळुंगी चे आदर्श सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी केले होते*.
धर्म सभेप्रसंगी वाजेवाडी चे उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्च्या पुणे जिल्हा सचिव अमितजी सोनावणे, अनिल तीळवणकर,प्रदीपजी कुलकर्णी,निमगाव म्हाळुंगी चे माजी आदर्श सरपंच ऍड रावसाहेब करपे,चेतन गायकवाड यांच्या उपस्थिती मध्ये धर्मसभा पार पडली,
श्री रामभक्तांच्या मिरवणुकीदरम्यान गावातील सर्व श्रीराम भक्तांना भगवे फेटे बांधून ढोल ताशाच्या गजरा मध्ये ढोल ताशा पथकातील रामभाऊ कुटे, जालिंदर कुटे, या दोन बंधुच्यासह अंकुश चव्हाण, संपत चव्हाण, दत्तात्रय काळे, दादाभाऊ काळे दत्तात्रय चव्हाण, तुकाराम चौधरी, श्री गावडे काका, मारुती चव्हाण यांच्या माध्यमातून गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच सर्व श्रीराम भक्तांवर मिरवणूकदरम्यान फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच श्री रामाच्या जयघोषाने अखंड निमगाव म्हाळुंगी दूमदूमली गेली होती.तसेच महिला भक्तांमध्ये श्री रामाचे भजन मोठ्या आवाजात गायिले जातं असतानाच गावातील वातावरण सर्व श्रीराम भक्तिमय होऊन गेले होते,
सदर कार्यक्रम प्रसंगी मिलिंदभाऊ एकबोटे यांनी अयोध्या येथे कारसेवक म्हणून गेले असता तेथिल सदर वेळीचा अनुभव सर्व श्री रामभक्तांना सांगतेवेळी सर्व श्री राम भक्तांच्या अंगावर शहारे आले.पुण्यातून आलेले श्री रामभक्त अनिल तीळवणकर, अमितजी सोनावणे, प्रदीपजी कुलकर्णी ऍड रावसाहेब करपे,श्रीराम भक्तांच्या वतीने रंजना चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अक्षय मुरडे, जय भाटिया,शंकर शिंदे, विशाल वराडे, आदित्य चव्हाण, आर्या वाघ यांनी आपली संघाची पद्ये गायली त्यामुळे सर्व श्रीराम भक्तांमध्ये चैतन्य निर्माण होत होते,
सदरचा कार्यक्रम संपल्या नंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसादाचा लाभ सर्व श्री रामभक्त आणि गावातील ग्रामस्थांनी घेतला आणि सर्वात शेवटी पदमा थोरात, रंजना चव्हाण, चंद्रकला काळे, वैशाली चव्हाण यांच्यासह गावातील महिला श्रीराम भक्तांनी निमगावला येत असताना रेल्वेत पाठ केलेले श्री रामाचे गीत गायले व त्या नंतर कार्यक्रमांची सांगता झाली,
कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग,निमगाव म्हाळुंगी च्या माजी आदर्श सरपंच छायाताई चव्हाण,ग्रा. सदस्य डॉ सचिन चव्हाण,अजित शेठ चौधरी,दत्तात्रय नागवडे, बाळासाहेब चव्हाण, नामदेव काळे,बाबासाहेब नागवडे दिलीप चव्हाण,सूर्यकांत काळे, संतोष काळे,रामदास जायकर, बाळासाहेब थोरात,जयसिंग चव्हाण, बाळासाहेब पवार, शंकर चव्हाण, किसन चव्हाण, विलास रणसिंग, पांडुरंग काळे, खंडू काळे,रामदास चव्हाण या श्री रामभक्तांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमगाव म्हाळुंगी चे आदर्श सरपंच आणि श्रीराम भक्तांच्या मिरवणूक व धर्मसभेचे आयोजक बापूसाहेब काळे यांनी केले असून सूत्रसंचालन संचालन आबासाहेब शितोळे यांनी केले तर सर्व श्री रामभक्तांचे आणि ग्रामस्थांचे आभार अमित जायकर यांनी मांडले*