पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापुर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये मंगळवारी (ता. ०५) रोजी मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी मुक्या प्राण्यांचा लचके तोडून जीव घेतला आहे.
यामध्ये प्रकाश बेसके यांचे एक करडू, सर्जेराव चांदगुडे यांची एक शेळी व दोन लहान करडे, तसेच सुनिल साहेबराव चांदगुडे यांची एक शेळी व तीन करडे अशी मिळून एकूण आठ मुक्या प्राण्यांचा मोकाट कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतला आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे शेतकर्यांचे खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. गावामध्ये असे प्रकार घडत राहिले तर ग्रामपंचायत म्हसोबाचीवाडी व यासाठी असणारा संबंधित विभाग मोकाट असणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहे का? असा सवाल संतप्त शेतकर्यांकडून प्रशासनास होत आहे. तरी शेतकर्यांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालुन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व शेतकऱ्यांकइून होत आहे.