पुणे जिल्हा प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील एमआयडीसी ते निरगुडे रस्ता हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झाला असून बारामती तालुक्याच्या हद्दीपर्यंत( वेताळाचा माळ ) सदरील रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे परंतु इंदापूर तालुक्यातील हद्दीपासून रस्त्याचं रुंदीकरण झालेले नाही तसेच रस्त्यांच्या साईट पट्ट्या पूर्णता उखडून त्याला मोठे खड्डे पडलेले आहेत तसेच रस्त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून त्यामुळे त्या रस्त्याला दररोज छोटे छोटे अपघात घडत आहेत,
तसेच बारामती एमआयडीसी पासून हा रस्ता पुणे सोलापूर हायवे ला (बिल्ट ग्राफिक्स पेपर मिल ) जवळ जोडला जात असल्या कारणाने व हे अंतर कमी असल्याने या रस्त्याला मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढलेली आहे.
आज दिनांक ०५/०३/२०२४ रोजी म्हसोबावाडी निरगुडे रस्त्यावरती मोठा खड्डा असल्याने तो चुकवण्याच्या नादात स्वीफ्ट चारचाकी गाडी रस्त्याच्या खाली जाऊन गाडीचे पुढच्या बाजूने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी सदरील रस्त्यांच्या खड्ड्यांचे डागडुजी व साईड पट्ट्या भरण्याचे काम प्रशासन करणार आहे का ?
कि कोणाचा तरी जीव गेल्यानंतर प्रशासन काम करणार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया समस्त वाहन चालकांकडून येत आहेत तरी लवकरात लवकर ते खड्डे व साईड पट्ट्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत आहे.