पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या विभाग स्तरीय 'नमो महा रोजगार मेळाव्या'चा उद्घाटन सोहळा ( दि.२/०३/२०२४ ) रोजी संपन्न झाला. या सोबतच बारामती येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण देखील करण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, नवीन बारामती बस स्थानक, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतींचे उद्घाटन व पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या आणि गाड्यांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्यातून स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडवण्याची संधी तरुणांना मिळाली आहे. राज्यातील तरुणांना ७५ हजार रोजगार देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आजवर १ लाख तरुणांना रोजगार दिले असून आज या ठिकाणी देखील २५ हजार तरुणांना रोजगार देण्यात येतील असे सांगितले. शासन आपल्या दारी मधूनही २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळवून देण्यात आले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पन पार पडले यावेळी या कार्यक्रमाला उपस्थीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे उपस्थित होते.