घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद, आरोपी कडून घरफोडीचे ०३ गुन्हे उघड,गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

Bharari News
0
हवेली प्रतिनिधी 
               पुणे दि.२६ मार्च २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक युनिट पथकाने आरोपी कुणाला ऊर्फ बाब्या ठाकुर यास सापळा लावून भापकर मळा येथून ताब्यात घेऊन जेरबंद केले तसेच घरफोडीचे तीन गुन्हे उघड तसेच आरोपीकडून एकुण १,५४,०००/- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
              प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंगचे पेट्रोलिंग करित असताना युनिटचे अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त बातमीमार्फत पोलीसांच्या रेकॉर्ड वरील अटल गुन्हेगार कुणाला ऊर्फ बाब्या ठाकुर हा इंद्रप्रस्थ लॉन्स कडुन भापकर मळयाकडे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत समजली सदर ठिकाणी सापळा लावण्यात आला होता त्यावळी एक इसम हा संशयीत रित्या उभा असल्याचे दिसल्याने त्याची चौकशी केली असता तो पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यास पोलीस पथकाने पकडले त्याची अधिक चौकशी करता त्याचे नाव कुणाल ऊर्फ बाब्या प्रल्हाद ठाकुर वय २३ वर्षे रा. गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर, पुणे असे सांगितले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेतली असता त्याचेकडे सोन्याचे दागिने मिळुन आल्याने ते जप्त केले असुन सदर बाबत
त्याचेकडे चौकशी केली असता त्याचे चौकशीमध्ये तिन ठिकाणी घरफोडी केल्याचे उघडकीस आले.
           सदर बाबत पोलीस स्टेशनकडील अभिलेख तपासला असता पुढील प्रमाणे :
१) वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ११३/२०२४ भा.द.वि. कलम ३८०,४५७,
२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १२६ / २०२४ भा.द.वि. कलम ३८०,४५४
३) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २६/२०२४ भा. द.वि. कलम ३८०, ४५४,४५७
एकुण तिन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्हयातील एकुण १,५४,०००/- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमुद आरोपी विरुद्ध यापुर्वी येरवडा, हडपसर, लोणावळा सिटी इत्यादी पोलीस स्टेशन
येथे घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
          सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, प्रवीण पवार,पोलीस उप आयुक्त, पुणे शहर,. शैलेश बलकवडे,. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे -२, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, शेखर काटे ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!