सुनील भंडारे पाटील
पुणे सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३ पुणे संभाजी कदम यांचे आदेशानुसार धुलिवंदन सणा निमीत्ताने तुकाई नगर सर्कल सिंहगड कॉलेज रोड पुणे येथे नाकाबंदी चालू असताना त्या दरम्यान दोन अल्पवयीन मुले मोटरसायकल चालविताना आढळले पोलीसांनी त्यांची चौकसी केली असता त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे व दोघेही अल्पवयीन असल्याचे दिसुन आले पालकांना माहिती होते की, आपली मुले अल्पवयीन आहेत तसेच मुलांकडे लायसन्स सुद्धा नाही तरी पण गाडी चालविणेसाठी दिल्याने पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांच्या तक्रारीवरून पुणे शहर, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा सन १९८८ चे कमल ३,५,१९९ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलांना त्यांचे वयाचे २५ वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजुर करु नये या करीता प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना पत्र देण्यात आले आहे. मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना पत्र देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परि- ३ पुणे संभाजी कदम, मा. सहा.पोलीस आयुक्त,
सिंहगड रोड विभाग, पुणे, भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे, दिपक गबदुले, होमगार्ड सोनवणे यांनी केली आहे.
सर्व पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविस देवु नये अन्यथा वाहने जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.