सुनील भंडारे पाटील
दिल्लीचे माझी मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना अखेर ई डी डिपार्टमेंट ने ताब्यात घेतली आहे, आत्ताच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,
देशभरामध्ये अनेक राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचार तसेच अवैध मार्गाने जमा केलेल्या संपत्तीवर टाच येत असून अनेक घोटाळेबाजांवर ईडीने आपला निशाणा साधला आहे, एकेकाळी दिल्लीत दबदबा असणाऱ्या केजरीवाल यांच्यावर दारू घोटाळ्याचा मोठा आरोप आहे, या संदर्भात त्यांना ई डी विभागाकडून अनेकदा नोटीसही देण्यात आले होत्या, आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये इडी कडून केजरीवाल यांना आठ नोटीस देण्यात आले होत्या, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ईडी कडून केजरीवाल यांना अटक करण्यात आले आहे,
केजरीवाल यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जामीन मंजूर न झाल्यामुळे त्यांना पुढील तपासासाठी ईडी ने ताब्यात घेतले असून त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,