पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून समितीमध्ये यापूर्वी वाघोलीचे भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांचा समावेश करण्यात आला असतानाच वाघोलीचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शांताराम कटके यांचाही समावेश करण्यात आला आहे.
३४ गावांमध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेल्या वाघोलीतून समितीत दोघांची निवड झाली असल्याने समितीच्या माध्यमातून वाघोलीला सर्वाधिक मुलभूत सोयीसुविधा मिळण्यासाठी मदत होणार आहे.
वाघोली येथून समितीत निवड झाल्याबद्दल शांताराम कटके व संदीप सातव यांचे अभिनंदन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले.तर भाजपच्या वतीने कंद यांच्या हस्ते शांताराम कटके यांचा सत्कार पार पडला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) चे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे,आदी पदाधिकारी,मान्यवर उपस्थित होते.