कोरेगाव पार्क येथे उपनिरीक्षक मृत अवस्थेत; पोलिस दलात खळबळ

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
            पुणे कोरेगाव पार्क परिसरात पोलीस उपनिरीक्षक मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक मृतावस्थेत सापडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
             दत्तात्रय कुरळे असे मृतावस्थेत सापडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.कुरळे पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) नियुक्तीस होते. पोलीस दलात ते शिपाई म्हणून भरती झाले होते. पदोन्नतीने ते उपनिरीक्षक झाले होते. शनिवारी सकाळी कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक सात परिसरात कुरळे मृतावस्थेत सापडले. सुरुवातीला पोलिसांना त्यांची ओळख पटली नाही. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरुन ते पुणे पोलीस दलात उपनिरीक्षक असल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. कुरळे यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!