पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे बुधवार (दि.६)रोजी संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळी वस्त्र उद्योग मंत्रालयाकडून वस्त्र उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रेशीम उद्योजक व शेतकरी तसेच रेशीम अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, संपूर्ण भारतामध्ये सिल्क समग्र-२ योजनेच्या माध्यमातून शेतकरी व रेशीम उद्योजक तसेच व्यापारी यांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी लाभ दिला जात आहे त्यामध्ये तुती लागवड करून कोष उत्पादन करणे त्याच बरोबर धागा तयार करणे तसेच धाग्याला पीळ देणे तसेच रेशीम वस्त्र तयार करण्या साठी वेगवेगळ्या मशनरी आहेत त्यासाठी शेतकरी उद्योजक व व्यापारी यांना केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सिल्क समग्र-२ च्या माध्यमातुन वेगवेगळे लाभ दिले जात आहेत.
या व्हिडिओ कॉन्फरन्स ला पुणे जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी संजय फुले साहेब, सेंटर सिल्क बोर्ड बारामतीचे रेशीम शास्त्रज्ञ हुमायून शरीफ साहेब तसेच डांग मॅडम व सरपंच राजेंद्र राऊत, तसेच रेशीम उद्योजक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तरावरील शेतकऱ्यांचे अधिकाऱ्यांचे व मंत्र्यांचे अनुभव व मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झालेला आहे तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे श्री मनोज चांदगुडे, श्री अमोल चांदगुडे यांनी विशेष असे परिश्रम घेतले आहेत.