सुनील भंडारे पाटील
गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेची होणारी लूट भरारी न्यूज ने सातत्याने पाठपुरावा करून सहकारी बँका आणि पतसंस्था यांनी चालवलेली कर्जदारांची लूट याविषयी सत्य परिस्थिती समाजासमोर मांडल्याने आता वसुलीच्या गाड्या देखील फिरणे बंद झाली आहे, समाजात चाललेली ही लबाडी बंद झाल्याने नागरिकांनी भरारी न्यूजचे आभार मानले,
अतिरिक्त व्याजदर, व्याजावर व्याज, तारण नसताना पर्सनल लोन, व्यवसाय लोन याचा मिळकतीवर बोजा चढवून, ताबा,निलाव या सर्व लबाड्या समाजासमोर उघड झाल्याने, आता लोक हुशार झालेत रिझर्व बँकेचे नियम पायंदळी तुडवून जनतेच्या अज्ञान पणाचा फायदा घेत अनेक वर्षे यांनी लोकांना लुटले आहे, अगदी कोरोना काळात कर्जदारांच्या गावांमध्ये घराभोवती, शेजारीपाजारी चौकशी करणाऱ्या बँक वसुली पथकच्या गाड्या यावर्षी अर्धा मार्च महिना उजाडला तरी फिरताना दिसत नाहीत एरवी दरवर्षी यांची फेब्रुवारीतच वसुली जोरदार चालू होते, याचा अर्थ काय?
जनतेचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन या लोकांनी आज तोवर खूपच जनतेची मानसिक ताण तणाव देऊन, दादागिरी च्या मार्गाने अतिरिक्त रक्कम वसूल केल्याची घटना आत्तापर्यंत अनेक ठिकाणी घडले आहेत, कित्येकांनी तर या त्रासाला कंटाळून आत्महत्या केले आहेत, जर नियमात आहे तर वसुली पथकाच्या गाड्या फिरणे का बंद झाल्या म्हणजे याचा अर्थ सर्वांच्या लक्षात आला आहे,
अनेक महिन्यांपासून या अन्यायाला सामोरे जाण्याची व्यथा भरारी न्यूजने परखडपणे मांडल्याने निश्चितच अन्याय करणाऱ्या या संस्थाचालकांना चांगलाच धडा शिकवला आहे, बऱ्यापैकी ही लबाडी उघड व बंद झाल्याने जनतेमध्ये सर्व स्तरातून भरारी न्युज चे कौतुक व अभिनंदन होत आहे, बेकायदेशीर फिरणारे या वसुली पथकाच्या गाड्या दिसल्या तर चांगला चोप देण्याच्या तयारीत जनता आहे, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे,