आळंदी प्रतिनिधी
जागतिक महिला दिना निमित्त येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयास विविध सेवा भावी संस्थानचे पदाधिकारी तसेच आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण आदींनी भेट देऊन आरोग्य सेवक, महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक सोहळ्या अंतर्गत महिला दिन सामाजिक बांधिलकीतून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अर्जुन मेदनकर, संकेत वाघमारे, डॉ. उर्मिला शिंदे यांचेसह सेवक कर्मचारी यांनी महिला दिना निमित्त मार्गदर्शन केले. रुग्णालयात सेवा सुविधा दर्जेदार नियमित मिळत असल्याचे यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी राहुल चव्हाण, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, दिनेश कुऱ्हाडे, विशेष कार्यकारी अधिकारी संकेत वाघमारे, महाआरती सेवा ट्रस्टचे संचालक रोहिदास कदम यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे, वैद्यकिय अधिकारी डॉ सूर्यकांत देवडे, श्रीमती अर्चना खाटमोडे , दिपाली लोंढे, स्नेहल साबळे, अनुराधा मोरे, कल्याणी राऊत, पल्स पोलिओ लशीकरण मोहिमेत विशेष योगदान देणारे राजमाता जिजाऊ महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यी यांचा सत्कार प्रमाणपत्र, गुलाबपुष्प, पेन, डायरी देऊन श्री आळंदी धाम सेवा समितीचे वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पल्स पोलिओ मोहीमेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल रुग्णालयाचे कर्मचारी आणि राजमाता फार्मसी कॉलेज येथील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.