किल्ले शिवनेरीवर आज पासून वनविभागाचा प्लास्टिक बंदीचा निर्णय

Bharari News
0
जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
              श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर हजारो पर्यटक महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. आज जागतिक वन दिनानिमित्त जुन्नर वन विभागाच्या वतीने किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला, तसे आवाहन अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर, अमित भिसे,सहाय्यक वनसंरक्षक यांनी केले. जागतिक वन दिनाचे औचित्य साधुन यावेळी शुभारंभ करण्यात आला. 
              पर्यटकांनी प्लास्टिक बंदी असल्यामुळे शक्यतो किल्ल्यावर जाताना प्लास्टिक घेऊन जाऊ नये, प्लास्टिक आढळून आल्यास किंवा इतरत्र प्लास्टिक टाकल्यास वनविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर यांनी किल्ले शिवनेरीवर आलेल्या पर्यटकांना मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच वनविभाग जुन्नर व पुरातत्व विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली असल्याबाबत त्यांनी सांगितले. येणाऱ्या पर्यटकांनी गडावर येताना प्लास्टिक घेऊन येऊ नये व आणले असेल तर ते तपासणी दरम्यान आढळून आले तर किल्ल्यावर घेऊन जाण्यास बंदी असेल. त्यामुळे पर्यटकांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
                वनविभाग जुन्नरकडे तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांची प्लास्टिक बंदी होण्यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. याबाबत वनविभाग जुन्नर, शिवाई देवी ट्रस्ट आणि भारतीय पुरातत्व विभागाचे वतीने निर्णय घेण्यात आला तसेच प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
          जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे यश मस्करे, सह्याद्री गिरी भ्रमण संस्थेचे . राहुल जोशी,. जितेंद्र हांडे,. सुनील सोनपाटकी,, राकेश पांडव, धर्मेंद्र कोरे, प्रविण फल्ले, स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेचे विजय कोल्हे, शिवाजी ट्रेल संस्थेचे ओंकार ढाके, जुन्नरी कट्टा चे राजेंद्र जुंदरे, आपला आवाजचे. पवण गाडेकर यशदा पुणे चे.अमोल भामिस्टे, . योगेश कांबळे, शिवाई देवी ट्रस्टचे प्रकाश ताजणे, राजेंद्र भगत, विकास दुराफे व कुसुर गावचे ग्रामस्थ तसेच वनपरीक्षेत्र जुन्नर चे. प्रदीप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर, वनपाल नितीन विधाटे, शेखर बैचे, वनिता होले, वनरक्षक रमेश खरमाळे, देविदास मिसाळ, स्वरूप रेंगडे, मंगल काळे, कल्याणी पोटवडे, राजेंद्र गायकवाड, एकनाथ बांगर, संदिप लांडे, किशन खरोडे, भारतीय पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे, आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!