जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
जुन्नर शहरात कत्तलखाना असून गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी भाकड जनावरे किंवा लहान गोवंशाची निर्घृणपणे हत्या त्या ठिकाणी होत असतात .
जुन्नर शहरात काही जनावरे कत्तलीसाठी घेऊन आल्याचे जुन्नर पोलीस स्टेशनला कळले असता त्यांनी चौकशी केली असता जुन्नर गावच्या हद्दीत शुक्रवार पेठ हनुमान मंदिराजवळ असीम खालील कुरेशी यांच्या दरवाजासमोर 11 गोवंश जातीचे जनवारे हे दाटीवाटीने व चारा पाण्याची कुठली व्यवस्था न करता दोरीच्या साह्याने जखडून बांधल्याचे आढळून आले .
कुरेशी यांच्याकडे पशुवैद्यकीय यांचे प्रमाणपत्र नसल्याचेही आढळून आले व त्यांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न देता उडवडीची उत्तरे दिली त्यामुळे हे गोवंश कत्तलीसाठी बांधण्याचे माहिती मिळाल्याचे समजले.एकूण 11 गोवंश त्या ठिकाणी आढळून आले असता त्याची अंदाजी किंमत 54,000 असून हे गोवंश ताब्यात घेऊन त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले असून संबंधितावर
गु.रजि.नं 97/2024,भा. द .वि .क महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (अ ),5 (ब )'9( अ ),9 (ब )प्रमाणे . दादाभाऊ लहानु पावडे पोलीस शिपाई बक्कल नंबर 710 नेमणूक जुन्नर पोलीस ठाणे यांच्या फिर्यादी वरून आरोपी असीम खलील कुरेशी याच्यावर वरील कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुण्य आणि पावन झालेल्या पवित्र शिवजन्मभूमीतील गोवंश हत्या बंद व्हाव्यात अशी मागणी देखील अनेक दिवसापासून होत आहे तरीही कुणाच्या वरदहस्थामुळे किंवा कुणाच्या फायद्यासाठी या ठिकाणी हे कृत्य चालू आहे याचीही चौकशी व्हावी अशी मागणी गोरक्षकांकडून होत आहे.
वरील प्रकरणाचा तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पो स इ पर्वते, जुन्नर पोलीस ठाणे दाखल व पोहेकॉ/268 पवार जुन्नर पोलीस ठाणे हे करत आहे .