लोणीकंद पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार तडीपार- वाचा पुणे जिल्ह्याची यादी

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी 
              लोणीकंद ( ता. हवेली ) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या गौरव ऊर्फ महादु सातव वय ३३ वर्षे, रा. डोमखेल वस्ती आव्हाळवाडी ता.हवेली जि. पुणे, महेंद्र संभाजी कुटे, वय ३८ वर्षे, रा.आव्हाळवाडी ता. हवेली, जि. पुणे गुन्हेगारास हद्दपार केले आहे,
            पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ मधील पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खून, खुनाचा
प्रयन्त, जबरी चोरी, दरोडयाची तयारी करणे, ईच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, दुखापत करून मारहाण करणे, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशिर अग्निशस्त्र व प्राणघातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगणे, दहशत करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी व घरफोडी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या 
रेकार्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा म्हणुन संबंधीत पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलीस उप आयुक्त, परि ४ पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पुर्ण करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे ११ गुन्हेगारावर व कलम ५७ प्रमाणे ०१ गुन्हेगार असे एकुण १२ गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन तडीपार आदेश केलेले आहेत. 
         तडीपार करण्यात आलेल्या आरोपी मध्ये येरवडा पोलीस स्टेशन कडील १) हरजितसिंग ऊर्फ सोनु सरबजितसिंग सिंध्दु वय ४५ वर्षे, रा. स.नं. १९१ भंगार गल्ली नागपुरचाळ, येरवडा पुणे, २) विकास ऊर्फ
महाराज भगत तौर,वय ३६ वर्षे, रा.स.नं. १२ क्षिरसागर हॉलमागे लक्ष्मीनगर येरवडा पुणे, ३) अजय गणेश राठोड,वय २४ रा.स.नं.१४ लाकडी वखारी जवळ जयजवाननगर येरवडा पुणे, ४) रुपेश दिलीप आडागळे वय २४ वर्षे रा.स.नं.१०३ माऊली चौकाजवळ जय प्रकाशनगर येरवडा पुणे ५) शंकर मानु चव्हाण, वय ५४ वर्षे, रा. स.नं.१४ पांडुलमाणवस्ती येरवडा पुणे विमानतळ पोलीस स्टेशन कडील ६) बळीराम सुदाम पतंगे,वय २३ वर्षे,रा.दिनकर पठारे वस्ती, दुर्गा माता मंदिरा शेजारी, खराडी पुणे व ७) अरबाज असलम शेख, वय २२ वर्षे, रा.एस.आर.ए.बिल्डींग विमाननगर पुणे ८) योगेश प्रकाश म्हस्के, रा. गल्ली नं.४ यमुनानगर विमाननगर पुणे, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन कडील ९) गणेश यमनप्पा कुर्डेकरी, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. १ चाळ क्र.६ नेरेगल मठाजवळ, पांडवनगर, पुणे १०) सोमनाथ ऊर्फ सोम्या धोत्रे, वय ४५ वर्षे, रा. आकाश गंगा सोसायटी समोर, सार्वजनिक संडास शेजारी, वडारवाडी पुणे, लोणीकंद पोलीस स्टेशन कडील ११) गौरव ऊर्फ महादु सातव वय ३३ वर्षे, रा. डोमखेल वस्ती आव्हाळवाडी ता.हवेली जि. पुणे, १२) महेंद्र संभाजी कुटे, वय ३८ वर्षे, रा.आव्हाळवाडी ता. हवेली, जि. पुणे यांचा समावेश आहे. 
            सदर कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ हददीतील रेकॉर्डवरील क्रियाशिल गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतीबंधक कारवाई करुन गुन्हेगारीस प्रतिबंधक
करणे कामी भर देण्यात येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!