येथील आळंदी पंचक्रोशीत ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांच्या जल्लोषात तसेच उत्साही युवक तरुणांचे उत्साहात भव्य मिरवणुकीने आळंदीत तिथी नुसार शिवजयंती गुरुवारी ( दि. २८ ) उत्साहात साजरी करण्यात आली.
आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी आळंदीकर ग्रामस्थांच्या तर्फे अभिषेक व श्रींचे पुजन करण्यात आले.
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी कैलास कैंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परीसरात सुशोभीकरण करून आळंदीत वैभवात वाढ केली. आळंदीतील या आकर्षक नुतनीकरण करण्यात आलेल्या शिवाजी महाराज स्मारकावर मोठ्या उत्साहात शिव पूजन आणि पुष्पहार अर्पण करून पुष्प अरियन करून अभिवादन करीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मृतिस अभिवादन करीत मानाचा त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला. शिव पराक्रमाची गाथा असलेल्या पोवाडा यावेळी शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होता
आळंदीत एक गाव एक शिवजयंती उत्सव तिथीनुसार साजरा करण्यात आला. तत्पूर्वी शासकीय शिवजयंती उत्सव देखील १९ फेब्रुवारी मध्ये साजरा झाला आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने चाकण चौक येथून सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य नेत्रदीपक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रात्री उशिरा झाली.
आळंदीतील सकाळ पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक, भाविक, वारकरी, प्रशासन, आळंदीकर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परीसराचा कायापालट केल्याबद्दल आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवजयंती निमित्त आळंदी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिव स्मारक येथे विविध सेवा भावी संस्थांचे वतीने अभिवादन करण्यात आले. यात आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण, अनिल जोगदंड, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, अरुण घुंडरे पाटील, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, नितीन ननावरे, दिनकर तांबे, माऊली घुंडरे, गोविंद ठाकूर, सचिन महाराज शिंदे, अनिल जोगदंड, देशपांडे गुरुजी आदी मान्यवरांनी अभिवादन करीत पुष्पांजली अर्पण केली.