सारथीच्या प्रशिक्षणार्थींची चिंता वाढली, 'एमपीएससी' संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा परिणाम

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
           महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी 28 एप्रिल 2024 रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकली असून त्यामुळे सारथी मार्फत प्रशिक्षण घेणाऱ्या आणि विद्यावेतन मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे प्रशिक्षण आणि विद्या वेतना शिवाय पुण्यासारख्या मेट्रो शहरात पुढील काळ कसा घालवायचा असा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडलेला आहे. या वेळी सारथीच्या संबंधीत विभागाला विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
             छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत सारथी एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते त्यांना आठ महिने प्रशिक्षण आणि ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते तर महाज्योती आणि भारतीय संस्थान मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकरा महिने प्रशिक्षण आणि १० हजार रुपये विद्यावेतन दिले जाते खरं तर हे सर्व विद्यार्थी एकाच परीक्षेची तयारी करत असताना प्रशिक्षणाचा कालावधी आणि विद्यावेतन यात फरक का? असा प्रश्न सारखी मार्फत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी विचारत आहेत.
            तसेच इतर मागास प्रभागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू कराव्या असा निर्णय राज्य सरकारने जानेवारी २०२४ मध्ये घेतला होता,त्या अनुषंगाने सारथी मार्फत देण्यात येणारे प्रशिक्षण आणि विद्यावेतन यात बदल करावा असे मागणी आता विद्यार्थी करत आहेत राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यां पुढील तीन ते चार महिने शहरात कसे काढायचे असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे नाशिकचा विद्यार्थी सोनल पवार म्हणाला की मार्च नंतर सारथी संस्थेकडून मिळणाऱ्या विद्या वेतनाला ८ महिने पुर्ण होणार असल्यामुळे ते बंद होणार आहे त्यामुळे पुढील काही महिने पुण्यात राहून परीक्षेची तयारी कशी करायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे यावेळी जुन्नरचे विद्यार्थ्यांनी सोनल शिंदे म्हनाली की, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी दुष्काळी भागातून पुण्यात प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत आम्हाला पुढील परीक्षा पर्यंत प्रशिक्षण आणि विद्यावेत त्यांनी मिळाल्यास पुण्यात राहणे अवघड जाणार आहे                याबाबत सारथी कार्यालयात संचालकांकडे निवेदन दिलेले आहे सोलापूरची अश्विनी जाधव मनाली हे घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मी आत्तापर्यंत शिष्यवृत्ती मार्फत शिक्षण पूर्ण केलेले आहे परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षा होईपर्यंत प्रशिक्षण आणि विद्यावेतन दिले जावे याबाबत सारथी संस्थेची बाजू जाणून घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही
                  यावेळी सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी माध्यमांना सांगितला आहे की, सध्या आचारसंहिता लागू आहे या काळात आर्थिक निर्णय घेता येतील की नाही यासंदर्भात कायदेशीर बाबी सारथीचे व्यवस्थापकीय संचालकांमार्फत तपासून पाहण्यात येतील
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!