लोणीकंद (तालुका हवेली) येथील श्रीरामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर जुनियर कॉलेज व न्यूटन्स इंटरनॅशनल स्कूल यांच्या आयोजित दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियोग्यता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते,
यामध्ये जवळपास 90 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले या अभियोग्यता चाचणीमध्ये प्रथम क्रमांकावर सुमित सुदाम हाडबे द्वितीय क्रमांक आवर यश संतोष गारगटे व तृतीय क्रमांकावर रिया तुषार पिसाळ यांनी गुनानुक्रम पटकावला यामध्ये प्रथम क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्याला 9000 मेडल सर्टिफिकेट त्याचबरोबर द्वितीय क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्याला 7000 मेडल सर्टिफिकेट व तृतीय क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्याला 5000 मेडल सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले,
या परिसरातील अनेक संस्थेपैकी हा एक स्तुत्य उपक्रम आहे त्याचबरोबर दहावीनंतर त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मार्गदर्शन केले या अभियोग्यतेसाठी सूत्रसंचालन पडवळ मॅडम व बोरगावकर मॅडम यांनी केले त्याचबरोबर पाहुण्यांची ओळख गोडसे मॅडम आभार प्रदर्शन शिवले मॅडम रजिस्ट्रेशन व बक्षीस वितरण वाघ मॅडम कोतकर मॅडम या कार्यक्रमाचा खारीचा वाटा उचलणारे जंगले सर, पाटील सर,लोखंडे सर,आंबेडकर मॅडम, अंभोरकर मॅडम,नानकर मॅडम, मुरकुटे मॅडम, बिरादार सर, विना मॅडम व निवृत्ती यांचे योगदान महत्त्वाचे ठरले,