मुलीच्या लग्नाच्याच दिवशी वधूपित्यावर काळाचा घाला

Bharari News
0
मुलीच्या लग्नाच्याच दिवशी वधूपित्यावर काळाचा घाला
बेल्हे जेजूरी महामार्गावर टेम्पो व स्कुटीची धडक होऊन झालेल्या अपघातात स्कुटीवरील वधुपित्याचा मृत्यू तर वधूची धाकटी बहीण गंभीर जखमी झाली
शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात 
         लोणी (ता.आंबेगाव) येथील पोपळघट परिवारात (दि.३०)शनिवारी मुलगी अक्षदा चा विवाह सोहळा असल्याने आनंदाचे वातावरण होते सायंकाळी अक्षदाची सासरी जाण्याची वेळ आली पाठराखीण म्हणून जाणाऱ्या धाकट्या बहिणीची कपड्याची बॅग
आणण्यासाठी स्कुटीवरून चाललेल्या वधुपिता अक्षदाचा वडिलांवर काळाचा घाला पाठीमागून आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वधुपिता संदीप दत्तात्रय पोपळघट (वय :५0 वर्षे, रा.लोणी ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला
          तर स्कुटीवर पाठीमागे बसलेली नववधूची धाकटी बहीण ऋतूजा पोपळघट ( वय:१८ वर्षे ) हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोपळघट परिवाराचे जवळचे नातेवाईक व नववधू अक्षदाचा मामा माजी विद्यार्थी विकास प्रबोधणीचे सदस्य चेतन लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोपळघट परिवारातील अक्षदा हीचा विवाह लोणी गावाजवळील थापेवाडी येथील मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता उत्साहात पार पडला.
             सर्व नातेवाईक आनंदात होते सायंकाळी अक्षदाची सासरी जाण्याची वेळ आल्यावर पाठराखण करण्यासाठी नववधुची धाकटी बहीण ऋतूजाला पाठवायचे होते. म्हणून ऋतुजा वडीलांबरोबर लोणी येथील घरी कपड्याची बॅग आणण्यासाठी स्कुटी क्रमांक एम. एच.14 एच.एफ.1569 वरून लोणीच्या दिशेने जात असताना जेजुरी बेल्हे महामार्गावर बांधनवस्ती या ठिकाणी गतिरोधक आला म्हणून स्कुटीचा वेग कमी केला असताना त्याचवेळी पाठीमागून जोरात येणाऱ्या टेम्पो क्रमांक एम. एच. 12 एस. एफ. 7007 ने पाठीमागून जोरात धडक दिली.
             या धडकेत संदिप पोपळघट हे रस्त्यावर पडले त्यांच्या छातीवरून टेम्पोचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले डोक्याला जबर दुखापत झाली त्यांना चाकण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर मूलगी ऋतूजाच्या एक पायाला फॅक्चर व दुसऱ्या पायाला मोठी दुखापत झाली. संदिप पोपळघट यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांचे आज रविवार पहाटे निधन झाले.
             त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,दोन मूली असा परिवार आहे.आनंदात असलेल्या पोपळघट परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला तर मुलीच्याच लग्नाच्या दिवशीच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
           बेल्हे जेजूरी महामार्गावर लोणी परिसरातच गेल्या दोन तीन वर्षात अनेक लहान मोठे अपयात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक असून या गतिरोधकाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्याने किंवा पांढरे पट्टे नसल्याने अपघात होतात.
          सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर सूचना फलक व वाहतूक नियमांचे फलक बसवावेत अशी मागणी लोणी चे सरपंच सावळेराम नाईक व खडकवाडी चे माजी सरपंच आनिल डोके, पिंटु पडवळ यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!