मनोज जरांगे पाटील विधानसभेला देणार २८८ उमेदवार

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
          शहागड( जि.परभणी) येथून एक मोठी राजकीय बातमी समोर आलेली आहे. विधानसभेला महराष्ट्रातील २८८ मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.तर राजकीय पक्षांचं या गोष्टीने टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेला उमेदवार दिले नाही, मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलोय. विधानसभेला २८८ मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेचे रणशींग फुंकले आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, आम्ही विधान सभेची तयारी एक महिन्यांपासून सुरु केली आहे. मराठे, दलित आणि मुस्लिम बांधवानी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आम्ही आता तयारीला लागलेलो आहे.

प्रकृती बरी नसतानाही मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला मतदानाचा हक्क बजावला. परभणी मतदारसंघातील शहागड मधील गोरी गांधारी मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले आहे. छत्रपती संभाजीनगर हून ते रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचले..यावेळी प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, १०० टक्के मतदान करणे आवश्यक आहे. हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. यात आपण आजारी असो की काही आसो. 

भारताचे नागरिक म्हणून आपण आपलं मतदान करून कर्तव्य पार पाडलेल आहे.मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक उमेदवार अपक्ष रिंगणात उतरणार की मनोज जरांगे पाटील एखाद्या पक्षाची स्थापना करणार हे पाहणेही तितकेच महत्वाचं ठरणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!