आळंदी प्रतिनिधी
जय हरी, माऊली , रामकृष्णहरी नामजय घोषात ओळख श्री ज्ञानेश्र्वरीची या शालेय मुलांसाठी सुरू असलेल्या संत साहित्यावर आधारित संस्कारक्षम उपक्रमाचे विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ समता प्राथमिक विद्यालयात हरिनाम गजरात झाला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी, पत्रकार संघ या संस्थानचे माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. या प्रसंगी अध्यापक सुभाष महाराज गेठे, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, अर्जुन मेदनकर, विलास वाघमारे, विश्वम्भर पाटील, धनाजी काळे, संस्थेचे संचालक श्रीधर घुंडरे, समता विद्यालय सचिव श्रीकांत बापू फुगे, संस्था चालक अनघा फुगे, मुख्याध्यापिका शुभांगी घुंडरे, नारायण कवडे, मीनाक्षी साबळे, मल्लिकार्जुन एकलारे, यास्मिन शेख अर्चना चंदेवाड आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते शालेय बक्षीस विजेत्या मुलांचा तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, सर्व उपस्थित पदाधिकारी यांचा समता विद्यालयाचे वतीने सत्कार करण्यात आला.
या उपक्रमात समता प्राथमिक विद्यालय भोसरी येथे महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश, पंजाब आणि उत्तरप्रदेश मधील शालेय मुले शिक्षण घेत आहेत. ५ राज्यातील मुले या शाळेत शिक्षण घेत असल्याने खऱ्या अर्थाने येथे समता प्रस्तापित झाली आहे. या विद्यालयाचे माध्यमातून ओळख ज्ञानेश्वरीची, हरिपाठ पाठांतर या उपक्रमात सहभागी झालेल्या परराज्यातील मुलांचे सहभागाने उपक्रम महाराष्ट्रा बाहेरील शालेय मुलांपर्यंत पोहोचला आहे. आता देशासह जगात उपक्रम नेण्यासाठी यातून प्रेरणा मिळाली असल्याची भावना अध्यापक सुभाष महाराज गेठे यांनी व्यक्त केली.
गेठे महाराज यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती देत शालेय जीवनात सुरु झालेल्या या उपक्रमाची आवश्यकता व्यक्त करीत मुलांशी संवाद साधून आई, वडील, गुरुजन आणि आथिती हे देवा समान असून त्यांचा नेहमी आदर करावा असे संप्रदायातील दाखले देत सांगितले. यावेळी प्रकाश काळे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, मुख्याध्यपिका शुभांगी घुंडरे यांनी मार्गदर्शन केले. ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संत साहित्याचा प्रचार व प्रसार या उपक्रमातून केला जात आहे. सुमारे ४४ वर शाळेमध्ये परीक्षा झाल्या आहेत. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी समता विद्यालय भोसरी येथील मुलांसाठी ओळख ज्ञानेश्वरीची हा उपक्रम साप्ताहिक अध्यापन करीत वर्षभर राबवित यशस्वी केला.
यावर्षीचे निकालात ठरलेले गुणवंत विद्यार्थी यामध्ये साक्षी आनंदा डुमणे (प्रथम) वर्ग ६वी, वैष्णवी सुनील वरणकार (द्वितीय)वर्ग ५वी, अश्वरा समाधान ईसाई (तृतीय)वर्ग ६वी, गौरव देवानंद गाडे (चतुर्थ)वर्ग ७वी, मानसी प्रदीप मिश्रा (पाचवा) वर्ग ६वी, आदिती राजू राठोड (सहावा)वर्ग ७वी, श्रावणी सुनील बहिरे (सातवा) वर्ग ६वी, अर्पिता आनंद मौर्या (आठवा) वर्ग ५वी या गुणवंत मुलांचा समावेश आहे. उपस्थित मान्यवरांचे हस्ते यावेळी पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आले. परीक्षक अध्यापक म्हंणून पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक श्रीधर घुंडरे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाची सांगता पसायदानाने हरिनाम गजरात झाली.