हवेली प्रतिनिधी
लोणीकंद (तालुका हवेली) केसनंद रोड वरील बाबा पेट्रोल पंपावर ट्रक व गॅस वाहतुक करणाऱ्या टँकरची धडक होऊन अपघात झाल्याने टँकर मधील गॅस लिकेज झाला, घटनास्थळी लोणीकंद पोलीसांनी धाव घेतली असून बंदोबस्त तैनात केला , खबरदारीचा उपाय म्हणून लोणीकंद थेऊर रोड वाहतूकीस तात्पुरता बंद केला असून नागरीकांनाही येण्या-जाण्यात बंदी घातली आहे.
अपघात सकाळी आठ झाला. त्यामुळे सकाळपासून बचावकार्य सुरू झाले, गॅस स्फोटक असल्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सावधगिरीने पावले उचलली जात होती. भारत कंपनीच्या गॅस टँकरला अपघात होऊन मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. तो गॅस हवेमध्ये पसरण्यास सुरुवात झाली. या अपघातस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, हॉटेल, दुकाने आणि आसपास नागरी वास्तव्य आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लोणीकंद परिसरातील सर्व बंद ठेवण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे सगळी प्रशासकीय यंत्रणा वेगाने अलर्ट होऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे