पुणे जिल्हा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छूक होते, मात्र भाजपकडून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
महा विकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्या मधून उमेदवारी देखील देण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात दररोज नवीन बातम्या समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आलेली आहे.
भाजपा उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना घरातूनच विरोध होत आहे. त्यामुळे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रणजीत सिंह यांची भावकी असणारे आमदार रामराजे निंबाळकर , रघुनाथ राजे यांचा रणजीत सिंह यांना विरोध आहे. तर दुसरीकडे आता रामराजे यांच्या बहिण सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांनीही नुकताच करमाळा येथे जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिल्याचे पाहवयास मिळत आहे.
विशेष म्हणजे फलटण येथील ४० आजी माजी नगरसेवकां चाही मोहिते पाटील यांना पाठिंबा असल्याचे सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलेल आहे. आमदार रामराजे निंबाळकर , रघुनाथ राजे यांचा रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध आहेच मात्र आता सुभद्रा राजे यांचाही रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध पत्कारावा लागणार आहे. तर दुसरीकडे मात्र मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना ही निवडणूक आणखी सोपी झालेली पाहवयास मिळत आहे.