पुणे जिल्हा प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि कर्नाटक पोलिसांचे सशस्त्र दल सज्ज असणार आहे यापैकी सहा कंपन्या (पलटन) दाखल झालेल्या आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित शिरूर मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो यामध्ये बारामती मतदारसंघात खडकवासला विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही मतदारसंघ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आहेत तर शिरूर मधील हडपसर आणि भोसरी वगळता उर्वरित चार विधानसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभेतील फक्त मावळ विधानसभा क्षेत्राचा भाग हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित येतो अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेली आहे.
संवेदनशील केंद्रांवर चोख बंदोबस्त-पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती
बारामती लोकसभा मतदारसंघात सहा मतदान केंद्रे संवेदनशील आहेत त्यापैकी मुळशी हे दोन आणि इंदापूर येथे एक मतदान केंद्र आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव हे एक केंद्र संवेदनशील आहे मावळ लोकसभेत आठ संवेदनशील मतदान केंद्र आहेत मात्र त्यापैकी केवळ एक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आहेत या ठिकाणी आवश्यकतेनुसार अधिकचा चोख बंदोबस्त पाठवण्यात येणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत मतदान केंद्र संख्या
बारामती-1805, शिरूर-1137, मावळ-217
बारामतीचे मतदान दिनांक 7 मे रोजी तर शिरूर आणि मावळचे मतदान दिनांक 13 मे रोजी या दिवशी पार पडणार आहे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासह तसेच निवडणूक कामांसाठी पोलीस बंदोबस्त देण्याची जबाबदारी ही पुणे ग्रामीण पोलिसांवर आहे बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या मनुष्यबळासह सीआयएसएफ आणि कर्नाटक शसस्त्र पोलिसांच्या आठ कंपन्या जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असणार आहेत ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारितील तीन लोकसभा मतदार संघांपैकी मावळ मधील केवळ 217 मतदान केंद्रांचा समावेश आहे त्यामुळे पोलिसांना प्रामुख्याने बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.