सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील पांडुरंग (मामा) ढेरंगे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली ,निवडीचे पत्र ढेरंगे यांना नुकततेच देण्यात आले,
गंधर्व हॉटेल कोरेगाव भीमा येथे झालेल्या सभेमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाबा गोलंदाज यांच्या हस्ते प्रकाश आगळे यांची जालना जिल्हा अध्यक्षपदी व पांडुरंग ढेरंगे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी व योगेश देवरे जळगाव जिल्हा युवक अध्यक्षपदी व पांडुरंग जाधव यांची जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती यावेळी करण्यात आली यासंदर्भातील निवडीचेपत्र व आयडी कार्ड देऊन सत्कार करण्यात आले,